पौष्टीक लाडू











यूट्यूब वर एक cornflakes घालून कणिकेचे लाडू केलेले बघितले आणि तसे करायचा प्रयत्न केला .. थोडे बदल केले पण छान झाले एकदम... घरात सगळ्यांना आवडले..
पटकन संपले... त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला.. मग ठरवले तसेच परत करण्या पेक्षा अजून थोडा बदल करून बघावे करून... 

तर या वेळेस गव्हाचे पीठ आणि थोडे नाचणीचे पीठ पण घेतले. काय काय घेतले किती किती घेतले ते सविस्तर लिहिते खाली... 

1 कप कणीक
1/2 कप नाचणी पीठ
1 1/2 कप गूळ
1 कप तूप
1/2 कप cornflakes
1/2 कप स्पेशल K
1/2 कप खारीक पूड
1/2 कप बदाम पूड
1 टेबल स्पून वेलची पावडर
1/2 वाटी दूध

प्रथम खारीक पूड, बदाम पूड, स्पेशल K, cornflakes, गूळ, वेलची पावडर सगळे मिक्सरमध्ये घालून सरबरीत दळून घ्यायचे.

मग कढई मध्ये तूप घालून त्यात कणिक आणि नाचणी पीठ छान भाजून घ्यायचे... शेवटी गॅस बंद करून थोडे दूध घालून मग त्यात वरचे मिश्रण एकत्र करून छान मळून घायचे. 

गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे... पीठ गार झाले की वळताना कोरडे वाटू शकते ... मग हवे तर 1 चमचा दूध घालून मग वळायचे... 

Cornflakes मुळे छान क्रंची लागतात... सगळे पोष्टिक पदार्थ असल्याने लहान मोठे कोणी पण खाऊ शकतात.. 

मग करताय ना हे लाडू... करा आणि मला कळवा बरे का..

🌹🌹🌹🌹🌹

Comments

  1. Chhan distayt lady
    Ekda karun baghayla hawet

    ReplyDelete
    Replies
    1. thanks.. nakki kara aani kalava kase lagale te..

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम