Posts

Showing posts from July, 2020

मूगडाळ आप्पे आणि वाटी ढोकळा...

Image
आज आपण मुगडाळी पासून बनवलेले तीन पदार्थ बघणार आहोत. एकदाच तयारी करून घेऊन तिन्ही पदार्थ बनवता येतील.. आणि तसे पटापट होतात..ना तेलकट ना जास्त तिखट..  पाहुणे येणार असतील तर त्यांच्या साठी खास .. पोटाला त्रास न देणारे आणि त्यात लहान मुलांना सुध्दा आवडतील असे आहेत. चला तर मग बघुया कसे करायचे ते... एक वाटी पिवळी मुगडाळ 4 ते 5 तास स्वच्छ धुवून मग थोडे पाणी घालून भिजत ठेवायची. पाणी खूप घातले तर जास्तीचे पाणी फेकून द्यावे लागते आणि त्यातून डाळीचे सर्व सत्व निघून जाते.. मधूनच हवे तर बघायचे की डाळ कितपत फुगली आहे.. पाणी कमी वाटले तर थोडे वाढवायचे..   आता आपल्याला एक मिश्रण बनवून घ्यायचे आहे..  त्या साठी कांदा, कॉर्न, गाजर, भोपळी मिरची, पनीर, उकडलेला बटाटा, फरसबी, फ्लॉवर, मटार... ज्या भाज्या असतील त्या घ्यायच्या...  सगळ्या आपल्या आवडी प्रमाणे एकत्र करून त्यात मिरी पावडर, लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, कोथिंबीर, चाट मसाला .. ( पाव भाजी मसाला किंवा तत्सम रेडी मसाला सुध्दा चालेल) घालून अर्ध्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायच...

गाजर बीट पुलाव

Image
रोज रात्री जेवायला काय करावे हा न सुटणारा एक प्रश्न असतो.. साधारण 7 7.30 झाले की फ्रीज उघडायचा ... काय काय आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि मेनू फिक्स करायचा..  तसेच आज पण केले... फ्रीज मध्ये उकडलेले बीट होते , गाजर होते, टोमॅटो होते.. सकाळचा अर्धा कांदा होता एका डब्यात ... पटकन तांदूळ घेतला आणि धुवून ठेवला..  बीटा चे बारीक तुकडे केले, थोडे बीट किसून घेतले, गाजर, टोमॅटो पण चिरून ठेवले.. कांदा उभा चिरून घेतला.  कढई मध्ये तेल घेतले... त्यात कापलेली मिरची, कांदा, आले लसूण पेस्ट घातले, कांदा शिजल्यावर त्यात टोमॅटो, गाजर आणि बीट घातले.. मीठ घातले, तिखट, हळद घालून थोडे परतले.. मग त्यात तांदुळाच्या प्रमाणात पाणी घातले.. लिंबू पिळले, थोडी किंचित साखर घातली.. .. एक उकळी आल्यावर त्यात तांदूळ घातले आणि झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवून दिले.  भात चांगला शिजला की गॅस बंद करून तसेच झाकून ठेवले.  भाता बरोबर कुठलेही रायते करून घ्यावे.. एखादा पापड घ्यावा.. छान गरम गरम वाढून घेऊन संपवून टाकावे... मी टोमॅटो ची कोशिंबीर करून घेतली आहे...  म...

ओल्या खजुराचे लोणचे

Image
वडिलांनी परवा ओले खजूर आणून दिले.. आता घरी आवडीने ते कोणी खात नाहीत.... मागच्या वर्षी मी आणले होते तेव्हा त्याचे लोणचे घालावे असे मनात होते पण नाही जमले ... राहून गेलं..  मग या वेळेस नक्की घालायचे असे पक्के ठरवले.. आज दुपारी फ्रीज मधून ते काढले... ठेवतानाच धुवून ठेवले होते.. हल्ली सगळे धुवून वाळवून ठेवावे लागते ना... त्या corona मुळे.... 😄😄 साधारण 8 10 खजूर होते.. त्याच्या बिया काढून मध्यम बारीक आकाराचे तुकडे करून घेतले.. त्यात 1 चमचा लोणचे तयार मसाला, अंदाजे थोडे तिखट, थोडा गूळ, मीठ, धने जिरे पावडर, लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा (मी थोडा आळस केला... लिंबू फूल घातले)...  सगळे छान एकत्र केले आणि झाकून ठेवले. अर्ध्या तासाने गूळ विरघळला होता आणि लोणच्याला खार सुटला होता.  चव घेतली.. थोडे मीठ कमी वाटलं म्हणून घातले.. मस्त खजूर लोणचे तय्यार झाले.. एक वेगळी चव... सध्या काहीतरी वेगळे हवेच असते कारण त्याच एका गोष्टीत आपण बदल करू शकतो आहोत.. बाकी बाहेर जे काही चालले आहे त्यात आपल्या हातात फक्त काळजी घेण्या व्यतिरिक्त काही शिल्लक नाहीय...

आंबोळी ... थोडी वेगळी

Image
आंबोळ्या बऱ्याच घरी होतात.. प्रत्येकीची पद्धत वेगळी.. मापे वेगळी...  मी खालील प्रमाणे घेतले प्रमाण: 2 वाट्या जाड तांदूळ 1 वाटी उडीद डाळ  ( इथे अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मुगडाळ घेतली तरी चालते) हे दोन्ही एकत्र करून धुवून थोड्या पाण्यात भिजत ठेवायचे.  अर्धी वाटी पोहे ( कोणतेही) भिजवून धुवून डाळ तांदूळात मिक्स करायचे. अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे. हे सगळे साधारण 5 तास भिजले की कमीत कमी पाण्यात मिक्सर मधून बारीक करून ठेवायचे. मोठ्या भांड्यात ठेवावे म्हणजे फुगून आले तरी त्याला पुरेशी जागा असेल भांड्यात.  रात्रभर ठेवावे म्हणजे चांगले फुलून येते. सकाळी त्यात थोडे मीठ घालून थोडे पाणी घालून पीठ हलवून नीट करून घ्यावे. नॉन स्टिक किंवा लोखंडी तव्यावर जाडसर पसरवून दोन्ही बाजूने छान भाजून घेऊन चटणी बरोबर खायची. मी  यावेळेस नुसत्या आंबोळ्या ना घालता त्यात कांदा, हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरून घातली.. आणि मग त्याच्या आंबोळ्या केल्या.. ह्या नुसत्या दही किंवा लोणी बरोबर छान लागतात... चटणी नसली तरी धावते.. 😄😄 मी केली होती...