ओल्या खजुराचे लोणचे


वडिलांनी परवा ओले खजूर आणून दिले.. आता घरी आवडीने ते कोणी खात नाहीत.... मागच्या वर्षी मी आणले होते तेव्हा त्याचे लोणचे घालावे असे मनात होते पण नाही जमले ... राहून गेलं.. 
मग या वेळेस नक्की घालायचे असे पक्के ठरवले..
आज दुपारी फ्रीज मधून ते काढले... ठेवतानाच धुवून ठेवले होते.. हल्ली सगळे धुवून वाळवून ठेवावे लागते ना... त्या corona मुळे.... 😄😄
साधारण 8 10 खजूर होते.. त्याच्या बिया काढून मध्यम बारीक आकाराचे तुकडे करून घेतले..
त्यात 1 चमचा लोणचे तयार मसाला, अंदाजे थोडे तिखट, थोडा गूळ, मीठ, धने जिरे पावडर, लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा (मी थोडा आळस केला... लिंबू फूल घातले)... 
सगळे छान एकत्र केले आणि झाकून ठेवले.
अर्ध्या तासाने गूळ विरघळला होता आणि लोणच्याला खार सुटला होता. 
चव घेतली.. थोडे मीठ कमी वाटलं म्हणून घातले..
मस्त खजूर लोणचे तय्यार झाले..

एक वेगळी चव... सध्या काहीतरी वेगळे हवेच असते कारण त्याच एका गोष्टीत आपण बदल करू शकतो आहोत.. बाकी बाहेर जे काही चालले आहे त्यात आपल्या हातात फक्त काळजी घेण्या व्यतिरिक्त काही शिल्लक नाहीये. 

साध्या वरण भाता बरोबर पण याची चव छान लागेल..
फक्त हे जास्त दिवस टिकेल की नाही तेवढं अंदाज नाही.. तेव्हा फ्रीज मध्ये ठेवावे म्हणजे प्रश्न नाही खराब व्हायचा.. हो की नाही... 😊😊

चला तर मग करा असे लोणचे आणि कळवा मला..

🙏🙏🌷🌷🙏🙏


Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम