लिंबाच्या सालीचे गोड लोणचे
#lemon skin
#achar
#लोणचे
#लिंबाचे साल
मग जरा विचार केला आणि ठरवले की लिंबाचे लोणचे करताय तसेच लिंबाच्या सालीचे लोणचे करूया.. साखरेच्या पाकात करूया म्हणजे खराब होणार नाही.
प्रथम लिंबाच्या साली मिक्सर मधून सरबरीत करून घेतल्या.
मग वाटीने मोजून जेवढ्या साली तेवढी साखर, त्याच्या अर्धे तिखट.. (मी साधे तिखट आणि कश्मिरी तिखट एकत्र करून घेतले) , तेवढेच मीठ (मी सैंधव मीठ घेतले) आणि थोडे आले किसून एकत्र केले आणि गॅस वर ठेवले.
साखर विघळेपर्यंत पर्यंत हलवले. जसे घट्टा व्हायला लागले तसा गॅस बंद केला. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवले.
रंग पण छान आला आणि चवीला पण छान आंबट, गोड, तिखट आणि मधेच सालीची चव पण आली आहे. गरम गरम साधे वरण भात किंवा खिचडी बरोबर घ्यायला छानच लागेल..
चला तर मग... करून बघा... लिंबाच्या साली जमा करून ठेवा.. थोडे मीठ लावून ठेवल्या की खराब नाही होणार आणि हो.. एकदम पूर्ण पिळू नका.. थोडा रस ठेवा जर का लोणचे करायचे असेल तर..नाहीतर एखाद्या लिंबाचा रस घातलात तरी चालेल आटवताना.
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋





सुंदर रेसिपी करुन पहायलाच हवी !
ReplyDeletenakki kara..
DeleteArewa chhan
ReplyDeleteMe baghin han karun
nakki kara..
Delete