Posts

Showing posts from June, 2020

मेथी कॉर्न पनीर पुलाव

Image
मेथी कॉर्न पनीर पुलाव मेथी भरपूर होती घरात.. पराठे, डाळ मेथी खूप वेळा करून झालेय.. काहीतरी वेगळे करायचं मनात होते.  आमच्या कडे संध्याकाळी साधारणपणे वन पॉट मील असते.. आणि भाताचाच प्रकार जास्त करून होतो. मग ठरवले मेथी घालून पुलाव करूया.. आता फक्त मेथी घालून कसे चालेल... मग थोडे कॉर्न घेतले... थोडा कांदा टोमॅटो घेतले.. आणि सगळ्यांचे फेवरेट पनीर.. 🥰🥰 कूकर मध्ये तेल घालून त्यात लसूण, मिरची, कढीपत्ता आणि आले लसूण पेस्ट घातले.. मग टोमॅटो घातला.. मग हळद तिखट गरम मसाला घातला... कॉर्न घातले... मेथी घातली.. मीठ घातले.. छान परतून घेतले.. मग तांदूळ घातले आणि तांदुळाच्या दुप्पट पाणी घातले. आता पनीर घातले..  2 शिट्या काढल्या... मायक्रोवेव्ह मध्ये पापड भाजून घेतले आणि मस्त तुपाची धार घालून गरम गरम फस्त केला... 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

घावणे

Image
घावन हा प्रकार अनेक पद्धतीने वेगवेगळे पदार्थ घालून करतात. पटकन होणारा आणि मोठ्या प्रमाणात पसंत केला जाणारा नाश्ता ... वाटले तर जेवण म्हणून सुध्धा केला जातो.  माझ्या कडे ready to eat चे oats चे एक पाव भाजी flavor चे पाकीट होते. माझ्या डोक्यात एक आयडिया ची कल्पना आली... पटकन उठले आणि मिक्सरचे भांडे घेतले.. त्यात ते पाकीट रिकामे केले.. 2 2 चमचे ज्वारी पीठ, तांदूळ पीठ, बेसन, 1 चमचा नाचणी पीठ आणि रवा, लाल तिखट, मीठ घातले ... पाणी घातले आणि फिरवले एकत्र ...  मस्त घवणाचे पीठ तयार झाले... पटापट घावणे घातली नॉन स्टिक तव्यावर... आणि घराच्या पांढऱ्या लोण्या बरोबर गट्टम् केली... किती वेळ लागला असेल म्हणता... अहो बनवायला लागल्या पासून खाऊन होई पर्यंत फक्त १५ ते २० मिनिटे लागली हो...  असे ready to eat oats चे वेगळे वेगळे प्रकार मिळतात.. कुठलाही वापरून केले तरी चालेल.. वेगळी छान चव मिळते खायला... मग.. चला तर मग... करून बघा आणि मला कळवा लगेच..  😊😊😊😊

लाल भोपळा भाजी

Image
लाल भोपळा भाजी हा काही नवीन प्रकार नाहीये पण मी आज ही भाजी बऱ्याच महिन्यांनी केली. माझ्या आजोळी मी अशी भाजी खायचे.. माझ्या आजीच्या हातची. आई पण अशीच भाजी करायची जास्त करून. कधी कधी ती सुध्धा दाण्याचे कूट, चिंच गूळ गोडा मसाला असे मिक्सर मधून वाटून तो मसाला घालून पण करायची.  मी माहेरून कऱ्हाडे आणि सासरी देशस्थ ... त्यामुळे इथे शेंगदाणा कुटावर जास्त भर असतो.  आज जरा कांदा खोबरे घालून भाजी करावी वाटली... लाल भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. कांदा पण तसाच मध्यम चिरला. हिरव्या मिरच्या तिरक्या कापून घेतल्या. ओले खोबरे कोथिंबीर चिरून एकत्र करून ठेवली. गॅस वर पातेल्यात तेल घालून त्यात जिरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता मिरच्या घालून फोडणी केली. मग कांदा घालून परतला. मग त्यात भोपळ्याच्या फोडी घालून थोडे मीठ घातले. आणि वाफेवर छान शिजवून घेतली. मग त्यात खोबरे कोथिंबीर आणि चिमूटभर साखर घातली आणि परत एक छोटीसी वाफ काढली. झाली भाजी तयार... गरम गरम पोळ्या केल्या आणि पाने घेतली... घरात लेकीला आणि ह्यांना खूप आवडली... अजून काय पाहिजे असते आपल्याला... नाही का.. तुम्ही केली नसेल अशी भा...

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

Image
#lemon skin #achar #लोणचे #लिंबाचे साल आज आले लिंबाचा रस केला.. लिंबाच्या सालीचे खूप फायदे असतात हे माहीत असते पण नेहेमी टाकून दिल्या जातात. पण आज म्हंटले नाही टाकायच्या... काहीतरी करुयाच.. मग जरा विचार केला आणि ठरवले की लिंबाचे लोणचे करताय तसेच लिंबाच्या सालीचे लोणचे करूया.. साखरेच्या पाकात करूया म्हणजे खराब होणार नाही.  प्रथम लिंबाच्या साली मिक्सर मधून सरबरीत करून घेतल्या.  मग वाटीने मोजून जेवढ्या साली तेवढी साखर, त्याच्या अर्धे तिखट.. (मी साधे तिखट आणि कश्मिरी तिखट एकत्र करून घेतले) , तेवढेच मीठ (मी सैंधव मीठ घेतले) आणि थोडे आले किसून एकत्र केले आणि गॅस वर ठेवले.  साखर विघळेपर्यंत पर्यंत हलवले. जसे घट्टा व्हायला लागले तसा गॅस बंद केला. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवले. रंग पण छान आला आणि चवीला पण छान आंबट, गोड, तिखट आणि मधेच सालीची चव पण आली आहे.  गरम गरम साधे वरण भात किंवा खिचडी बरोबर घ्यायला छानच लागेल.. चला तर मग... करून बघा... लिंबाच्या साली जमा करून ठेवा.. थोडे मीठ लावून ठेवल्या की खराब नाही होणार आणि हो.. एकदम पूर्ण पिळू नका.. थोडा रस ठेवा जर का लोणचे करायचे अस...

पौष्टीक लाडू

Image
यूट्यूब वर एक cornflakes घालून कणिकेचे लाडू केलेले बघितले आणि तसे करायचा प्रयत्न केला .. थोडे बदल केले पण छान झाले एकदम... घरात सगळ्यांना आवडले.. पटकन संपले... त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला.. मग ठरवले तसेच परत करण्या पेक्षा अजून थोडा बदल करून बघावे करून...  तर या वेळेस गव्हाचे पीठ आणि थोडे नाचणीचे पीठ पण घेतले. काय काय घेतले किती किती घेतले ते सविस्तर लिहिते खाली...  1 कप कणीक 1/2 कप नाचणी पीठ 1 1/2 कप गूळ 1 कप तूप 1/2 कप cornflakes 1/2 कप स्पेशल K 1/2 कप खारीक पूड 1/2 कप बदाम पूड 1 टेबल स्पून वेलची पावडर 1/2 वाटी दूध प्रथम खारीक पूड, बदाम पूड, स्पेशल K, cornflakes, गूळ, वेलची पावडर सगळे मिक्सरमध्ये घालून सरबरीत दळून घ्यायचे. मग कढई मध्ये तूप घालून त्यात कणिक आणि नाचणी पीठ छान भाजून घ्यायचे... शेवटी गॅस बंद करून थोडे दूध घालून मग त्यात वरचे मिश्रण एकत्र करून छान मळून घायचे.  गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे... पीठ गार झाले की वळताना कोरडे वाटू शकते ... मग हवे तर 1 चमचा दूध घालून मग वळायचे...  Cornflakes मुळे छान क्रंची लागतात... सगळे पोष्टिक पदार्थ असल्याने लहान मोठे कोणी...