मेथी कॉर्न पनीर पुलाव
मेथी कॉर्न पनीर पुलाव
मेथी भरपूर होती घरात.. पराठे, डाळ मेथी खूप वेळा करून झालेय.. काहीतरी वेगळे करायचं मनात होते. आमच्या कडे संध्याकाळी साधारणपणे वन पॉट मील असते.. आणि भाताचाच प्रकार जास्त करून होतो.
मग ठरवले मेथी घालून पुलाव करूया.. आता फक्त मेथी घालून कसे चालेल... मग थोडे कॉर्न घेतले... थोडा कांदा टोमॅटो घेतले.. आणि सगळ्यांचे फेवरेट पनीर.. 🥰🥰
कूकर मध्ये तेल घालून त्यात लसूण, मिरची, कढीपत्ता आणि आले लसूण पेस्ट घातले.. मग टोमॅटो घातला.. मग हळद तिखट गरम मसाला घातला... कॉर्न घातले... मेथी घातली.. मीठ घातले.. छान परतून घेतले.. मग तांदूळ घातले आणि तांदुळाच्या दुप्पट पाणी घातले. आता पनीर घातले.. 2 शिट्या काढल्या...
मायक्रोवेव्ह मध्ये पापड भाजून घेतले आणि मस्त तुपाची धार घालून गरम गरम फस्त केला...
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
Comments
Post a Comment