लाल भोपळा भाजी
लाल भोपळा भाजी हा काही नवीन प्रकार नाहीये पण मी आज ही भाजी बऱ्याच महिन्यांनी केली. माझ्या आजोळी मी अशी भाजी खायचे.. माझ्या आजीच्या हातची. आई पण अशीच भाजी करायची जास्त करून. कधी कधी ती सुध्धा दाण्याचे कूट, चिंच गूळ गोडा मसाला असे मिक्सर मधून वाटून तो मसाला घालून पण करायची.
मी माहेरून कऱ्हाडे आणि सासरी देशस्थ ... त्यामुळे इथे शेंगदाणा कुटावर जास्त भर असतो.
आज जरा कांदा खोबरे घालून भाजी करावी वाटली...
लाल भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. कांदा पण तसाच मध्यम चिरला. हिरव्या मिरच्या तिरक्या कापून घेतल्या. ओले खोबरे कोथिंबीर चिरून एकत्र करून ठेवली.
गॅस वर पातेल्यात तेल घालून त्यात जिरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता मिरच्या घालून फोडणी केली. मग कांदा घालून परतला. मग त्यात भोपळ्याच्या फोडी घालून थोडे मीठ घातले. आणि वाफेवर छान शिजवून घेतली. मग त्यात खोबरे कोथिंबीर आणि चिमूटभर साखर घातली आणि परत एक छोटीसी वाफ काढली.
झाली भाजी तयार...
गरम गरम पोळ्या केल्या आणि पाने घेतली... घरात लेकीला आणि ह्यांना खूप आवडली... अजून काय पाहिजे असते आपल्याला... नाही का..
तुम्ही केली नसेल अशी भाजी तर करून बघा लगेच.. छान वाटते.. जरा बदल चवी मध्ये थोडासा..
🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷
Masst
ReplyDeleteAmhi koknastha .nehmich karto hi bhaji
A vitamin ne yukt ..tyamule poushtik. Ahe
Gawaar+ lal bhopla ashihi bhaji kartat
Keep it up😃
ho.. ti pan chan lagate. thanks..
Delete