गाजर बीट पुलाव







रोज रात्री जेवायला काय करावे हा न सुटणारा एक प्रश्न असतो.. साधारण 7 7.30 झाले की फ्रीज उघडायचा ... काय काय आहे त्याचा अंदाज घ्यायचा आणि मेनू फिक्स करायचा.. 
तसेच आज पण केले... फ्रीज मध्ये उकडलेले बीट होते , गाजर होते, टोमॅटो होते.. सकाळचा अर्धा कांदा होता एका डब्यात ...
पटकन तांदूळ घेतला आणि धुवून ठेवला.. 
बीटा चे बारीक तुकडे केले, थोडे बीट किसून घेतले, गाजर, टोमॅटो पण चिरून ठेवले.. कांदा उभा चिरून घेतला. 

कढई मध्ये तेल घेतले... त्यात कापलेली मिरची, कांदा, आले लसूण पेस्ट घातले, कांदा शिजल्यावर त्यात टोमॅटो, गाजर आणि बीट घातले.. मीठ घातले, तिखट, हळद घालून थोडे परतले.. मग त्यात तांदुळाच्या प्रमाणात पाणी घातले.. लिंबू पिळले, थोडी किंचित साखर घातली.. .. एक उकळी आल्यावर त्यात तांदूळ घातले आणि झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवून दिले. 

भात चांगला शिजला की गॅस बंद करून तसेच झाकून ठेवले. 

भाता बरोबर कुठलेही रायते करून घ्यावे.. एखादा पापड घ्यावा.. छान गरम गरम वाढून घेऊन संपवून टाकावे...

मी टोमॅटो ची कोशिंबीर करून घेतली आहे... 

मग कसा वाटला थोडा वेगळा प्रकार... 

यात तुम्हाला अजून काजू , शेंगदाणे काही घालायचे असेल तरी घालू शकता.. शेवटी कसे असते ना... Youtube वर recepie बघायच्या आणि आपण आपल्या पद्धतीने त्यात हवा तसा बदल म्हणा किंवा ट्विस्ट म्हणा करायचा... 

हाय काय नी नाय काय... 😄😄



Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम