भरले पडवळ
#पडवळ
#भरलेपडवळ
मला तर एकदम बारीक आणि कोवळे पडवळ मिळाले. म्हणून भरली पडवळ करायचे पक्के केले..
माझ्या नेहेमीच्या सवयी प्रमाणे नेहेमी पेक्षा वेगळे काहीतरी करावे.. पण काय करावे असा विचार डोक्यात चालू होता..
नेहेमी एक तर ओले खोबरे नाहीतर दाण्याचे कुट याचेच सारण केले जाते अश्या भाज्यांना. मला आज जरा वेगळे काहीतरी करायचे होते..
मग काय..सुरू केली कृती..
कांदा बारीक चिरून घेतला. फोडणीत लाल तिखट आणि गरम मसाला घालून चांगला परतून घेतला.मग त्यात दाण्याचे कूट, ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, गूळ, मीठ, धने जिरे पावडर आणि थोडे कश्मिरी तिखट घालून परत छान परतून घेतले. आणि हे मिश्रण गार करायला ठेवले..
तो पर्यंत पडवळाचे गोल गोल छोटे तुकडे केले.. त्यात बिया तश्या नव्हत्याच.. पण तरी चमच्याने आतून रिकामे करून घेतले.
मग त्यात वर केलेले सारण थोडे थोडे भरून घेतले.
एक पसरट पॅन घेतला.. त्यात थोडे तेल घातले आणि हे सगळे पडवळाचे तुकडे नीट लावून त्यावर झाकण ठेऊन मंद गॅसवर दणदणीत वाफ काढली. मग सगळे तुकडे परतून दुसऱ्या साईड ने सुध्धा छान वाफ दिली..
या भाजीला रस नाही ठेवला मी. कोरडीच छान लागली.
गरम गरम पोळ्या बरोबर कशी गट्टम् झाली कळली पण नाही.. 😀😀😀😀
मग .. अजून पावसाळा चालू आहे.. मिळतील छान पडवळ तुम्हाला सुध्धा.. करून बघा आणि कळवा मला आवडली का माझी ही वेगळी पद्धत...
🙏🙏🌹🌹
Comments
Post a Comment