मसूर बिर्याणी
#मसूर
#बिर्याणी
2 वाट्या बासमती तांदूळ
1 वाटी मोड आलेले मसूर
1 कांदा
1 टोमॅटो
आले लसूण पेस्ट
बिर्याणी मसाला
2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतले
कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला
कूकर मध्ये तेल घालून त्यात कढीपत्ता, कांदा घातला. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घातली.. मग टोमॅटो घातला. थोडे परतल्यावर त्यात बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, किंचित गरम मसाला घालून परतले. मग त्यात मसूर घालून थोडे परतले.मग तांदूळ घातला. थोडे परतून घेतले.
मग तांदुळाच्या दुप्पट पाणी घातले आणि 1 शिट्टी काढली.
वाफ पडल्यावर कूकर उघडला.
गरम गरम बिर्याणी, दही बुंदी आणि पापड सर्व्ह केले..
मसूर उसळी ऐवजी हा प्रकार बरा वाटतो.. पटकन होतो आणि झटकन संपतो... 😀😀😋😋
🙏🙏
Comments
Post a Comment