बिना ब्रेड चे सँडविच
#suji
#sandwitch
#bina bread
बिन ब्रेड सँडविच
🤔🤔🤔🤔🤔
नॉर्मली आपण सँडविच म्हंटले की डोळ्यासमोर काय येते तर 2 ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्यात वेगवगळ्या प्रकारचे stuffings घालायचं आणि सॉस बरोबर खायचे...
पण आज मी एक वेगळेच सँडविच बनवले त्यात ब्रेड नव्हता पण काही भाज्या मात्र होत्या...
एकदम पौष्टीक आणि पोटभर असा नाश्ता किंवा संध्याकाळी चहा बरोबर खायला एकदम छान आहे हे..
तर मग बघुया कसे करतात हे सँडविच...
एका बाउल मध्ये एक वाटी रवा घ्यायचा .. जो उपमा करायला वापरतो तोच.. भाजलेला, न भाजलेला कसाही.. त्यात एक वाटी दही घालून नीट एकत्र करून ठेवायचे... 15 मिनिटे भिजू द्यायचे.
तो पर्यंत त्यात घालायच्या भाज्या कापून घेऊया..
थोडे गाजर, भोपळी मिरची, कांदा, टोमॅटो, मटार किंवा कॉर्न, आले मिरची कोथिंबीर
आता हे सगळे त्या भिजलेल्या रव्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यात अगदी थोडे म्हणजे पाव कप पेक्षा पण कमी पाणी घालायचे. चवी पुरते मीठ, थोडी हळद, लाल तिखट हे पण घालायचे.
आता ह्या मिश्रणाचे 3 भाग करायचे.. एक भाग घेऊन त्यात अर्धा टी स्पून इनो घालायचे आहे.. एकदम सगळ्या मिश्रणात इनो नाही घालायचा.
ईनो घालायच्या आधी सँडविच toaster घेऊन त्याला आतून दोन्ही साईड ला तेल लावून गॅस वर ठेवायचा.. गॅस मंद ठेवायचा.. मग त्यात इनो घातलेले मिश्रण पूर्ण एका भागात व्यवस्थित पसरवायचे. Toaster बंद करून मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटे ठेवायचे.. मग साईड बदलून परत 3 ते 4 मिनिट ठेवायचे... गॅस मंद असला पाहिजे .
आता हळुवार पणे toaster उघडून बघायचा.. जर खरपूस झाले नसेल तर अजून एखादा मिनिट ठेवायचं.. दोन्ही साईड अश्याच खरपूस झाल्या की एका डिश मध्ये काढून उरलेल्या मिश्रणाचे अजून 2 सँडविच करून घ्यायचे आणि सॉस बरोबर खायचे...
लहान मुलांना आणि ज्यांना ब्रेड आवडत नाही, पचत नाही त्याच्या साठी ही एकदम छान डिश आहे.
चला तर मग पटकन करायला घ्या आणि सांगा मला कशी झाली ते.. छानच होईल.. खात्री आहे मला...
👍👍
Comments
Post a Comment