स्पघेती पास्ता in टोमॅटो क्रिमी सॉस
या साठी लागणारे साहित्य
200ग्रॅम स्पघेटी
1 गाजर बारीक चिरून
1 भोपळी मिरची बारीक चिरून
1 कांदा बारीक चिरून
5 टोमॅटो.. मोठे
1 tsp चिली फ्लेक्स
1 tsp ओरिगानो
कोथिंबीर बारीक चिरून
2 tblsp ऑलिव्ह ऑइल
मीठ, मिरी पूड
1/4 कप फ्रेश क्रीम
पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे. त्यात थोडे मीठ आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालायचे. पाणी उकळले की त्यात स्पघेती घालून थोडावेळ उकळवायचे. मग ते एका चाळणीत घालून drain करायचे आणि त्यावर गार पाणी घालायचे. म्हणजे स्पघेती जास्त शिजत नाही. ती चाळणी बाजूला ठेऊन द्यायची.
आता सॉस ची तयारी करूया
टोमॅटो कूकर मध्ये शिजवून घ्यायचे. वाफ उतरली की ते ताटात काढून गार करायचे. त्याची साले काढून त्याची मिक्सर मधून प्युरी करून घ्यायची.
मग एका मोठ्या कढई मध्ये तेल घेऊन (ऑलिव्ह ऑइल) त्यात लसूण आणि कांदा घालायचा. कांदा गुलाबी झाला की त्यात गाजर आणि भोपळी मिरची घालायची. ते चांगले शिजले की त्यात टोमॅटो प्युरी, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, ओरिगानो, मीठ आणि मिरी पूड घालून उकळी काढायची.
मग त्यात स्पाघेती घालून ढवळायचे.
शेवटी त्यात क्रीम घालून हलके मिक्स करायचे आणि गरम गरम सर्व्ह करायचे.
बरोबर कुठलेही सूप, गारलिक ब्रेड असे घेऊन मस्त dinner मेनू तयार होतो...
कधी करताय मग...
करा आणि मला कळवा बरे का..
😊😊😊😊
Comments
Post a Comment