हाक्का नूडल्स मोमोज

#momos
#मोमोज

🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟


मोमोज मी कधी खाल्ले पण नव्हते.. पण एका contest मधे भाग घेतला आणि तिथे हे करणे भाग होते... मग काय केली हिम्मत ... झाली बाई सफल... जमले बऱ्यापैकी... त्यातल्या त्यात healthy बनवायचा प्रयत्न केला... मैदा न वापरता कणिक वापरली... बाकी तेल सुध्दा फारसे लागत नाही.तिखट जळजळीत पण काही नाही.... त्यामुळे diet करणाऱ्यांना सुध्दा हे खाऊन त्रास होणार नाही ... ना वजन वाढणार..
आणि हो... यातले stuffing आपल्याला जसे हवे तसे वेगळे करून करून बघायला काहीच हरकत नाही.. 

मग करून बघा आता तुम्ही सुध्दा.
कृती दिलीये खाली..

1 वाटी कणीक, चिमूटभर ओवा, चवी पुरते मीठ
कोबी, गाजर, भोपळी मिरची, मक्याचे दाणे, आले, लसूण सगळे थोडे थोडे
Boiled नूडल्स
नूडल्स मसाला

प्रथम एक वाटी कणीक घेऊन त्यात ओवा मीठ घालून ना घट्ट ना सैल अशी भिजवून ठेवावी

कोबी गाजर भोपळी मिरची आले लसूण बारीक चिरून घ्यावे. मक्याचे दाणे कच्चे घ्यावे.. मी फ्रीजर मधे कणीस आणून दाणे काढून ठेवते... कच्चेच.. खूप दिवस टिकतात.. तसेच नूडल्स boiled करून घ्याव्यात आणि चाळणीत drain करायला ठेवाव्या.

आता गॅस वर frypan मधे थोडे तेल घालून त्यात आधी लसूण आले घालावे मग सगळ्या भाज्या घालाव्या. मोठ्या गॅस वर परतून घ्यावे... त्यात चींग हाक्का नूडल्स मसाला घालून परतावे. हा मसाला घातला की मीठ सुध्धा घालावे लागत नाही. मग त्यात boiled नूडल्स घालून परतून गॅस बंद करून ठेवावे.

आता कणकेचे 6 सामान गोळे करून घ्यावे. एक गोळी घेऊन पुरी सारखी लाटून घेऊन त्यावर नूडल्स ठेवावे आणि एका बाजूने पुरी उचलून छोट्या छोट्या अंतराने फोल्ड करून वरतून एकत्र करून बंद करावे.

असे सगळे मोमो बनवून एका ताटलीत खाली तेल लावून त्यावर ठेवावे.

मग गॅस वर एक कढई ठेऊन त्यात स्टँड आणि पाणी घालून पाणी उकळे पर्यंत झाकून ठेवावे.. पाणी उकळले की मोमोज ची ताटली त्या स्टँड वर ठेऊन झाकण ठेवावे आणि 15 मिनिटे वाफवून घ्यावे. मग गॅस बंद करून झाकण काढून ठेवावे... जरा थोडे थंड झाले की डिश मध्ये काढून शेजवान सॉस बरोबर खायला द्यावे. एकदम थंड करून खाऊ नये.. मज्जा येत नाही.

मला खरंच वाटले नव्हते की एवढे चांगले जमतील मला... पण जमले.. आणि लेकीने आवडीने खाल्ले पण..

🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟

Comments

Popular posts from this blog

पौष्टीक लाडू

लिंबाच्या सालीचे गोड लोणचे

ऋषीची भाजी किंवा बडम