Posts

हाक्का नूडल्स मोमोज

Image
#momos #मोमोज 🥟🥟🥟🥟🥟🥟🥟🥟 मोमोज मी कधी खाल्ले पण नव्हते.. पण एका contest मधे भाग घेतला आणि तिथे हे करणे भाग होते... मग काय केली हिम्मत ... झाली बाई सफल... जमले बऱ्यापैकी... त्यातल्या त्यात healthy बनवायचा प्रयत्न केला... मैदा न वापरता कणिक वापरली... बाकी तेल सुध्दा फारसे लागत नाही.तिखट जळजळीत पण काही नाही.... त्यामुळे diet करणाऱ्यांना सुध्दा हे खाऊन त्रास होणार नाही ... ना वजन वाढणार.. आणि हो... यातले stuffing आपल्याला जसे हवे तसे वेगळे करून करून बघायला काहीच हरकत नाही..  मग करून बघा आता तुम्ही सुध्दा. कृती दिलीये खाली.. 1 वाटी कणीक, चिमूटभर ओवा, चवी पुरते मीठ कोबी, गाजर, भोपळी मिरची, मक्याचे दाणे, आले, लसूण सगळे थोडे थोडे Boiled नूडल्स नूडल्स मसाला प्रथम एक वाटी कणीक घेऊन त्यात ओवा मीठ घालून ना घट्ट ना सैल अशी भिजवून ठेवावी कोबी गाजर भोपळी मिरची आले लसूण बारीक चिरून घ्यावे. मक्याचे दाणे कच्चे घ्यावे.. म

स्पघेती पास्ता in टोमॅटो क्रिमी सॉस

Image
या साठी लागणारे साहित्य 200ग्रॅम स्पघेटी  1 गाजर बारीक चिरून 1 भोपळी मिरची बारीक चिरून 1 कांदा बारीक चिरून 5 टोमॅटो.. मोठे 1 tsp चिली फ्लेक्स 1 tsp ओरिगानो कोथिंबीर बारीक चिरून 2 tblsp ऑलिव्ह ऑइल मीठ, मिरी पूड 1/4 कप फ्रेश क्रीम पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे. त्यात थोडे मीठ आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालायचे. पाणी उकळले की त्यात स्पघेती घालून थोडावेळ उकळवायचे. मग ते एका चाळणीत घालून drain करायचे आणि त्यावर गार पाणी घालायचे. म्हणजे स्पघेती जास्त शिजत नाही. ती चाळणी बाजूला ठेऊन द्यायची. आता सॉस ची तयारी करूया टोमॅटो कूकर मध्ये शिजवून घ्यायचे. वाफ उतरली की ते ताटात काढून गार करायचे. त्याची साले काढून त्याची मिक्सर मधून प्युरी करून घ्यायची.  मग एका मोठ्या कढई मध्ये तेल घेऊन (ऑलिव्ह ऑइल) त्यात लसूण आणि कांदा घालायचा. कांदा गुलाबी झाला की त्यात गाजर आणि भोपळी मिरची घालायची. ते चांगले शिजले की त्यात टोमॅटो प्युरी, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, ओरिगानो, मीठ आणि मिरी पूड घालून उकळी काढायची.  मग त्यात स्पाघेती घालून ढवळायचे.  शेवटी त्यात क्रीम घालून हलके मिक्स करायचे आणि गरम गरम सर

रसवाला खमण (गुजराती डिश)

Image
रसवाला खमण ही एक गुजराथी डिश आहे. मला सगळ्या गुजराथी आणि साऊथ इंडियन डिश खायला  आवडतात आणि करायला सुध्दा आवडतात..  Lockdown मधे मला नवीन नवीन पदार्थ करायला खूप वेळ मिळाला..  ह्या डिशला तसा बराच वेळ लागतो करायला पण खायला मात्र काही मिनिटे पुरतात.. चला तर मग बघुया कशी करतात ते.. *वाटी डाळ खमण* एक वाटी मुगडाळ पाव वाटीला थोडी कमी चणाडाळ 2 ते 3 हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा हळद, मीठ, तेल *रस्सा* 2 चमचे तूरडाळ 1 चमचा मुगडाळ 1/2 चमचा उडीदडाळ 1/2 चमचा चणाडाळ 3 लवंग 3 मिरी .. छोटा दालचिनीचा तुकडा मीठ मसाला तिखट हळद गरजे नुसार सलाड (toppings) 1 कांदा बारीक चिरून 1 टोमॅटो बारीक चिरून 1 काकडी बारीक चिरून थोडा कोबी बारीक चिरून बारीक शेव आणि कोथिंबीर डाळिंब दाणे असले तर ते पण चालतील आदल्या दिवशी रात्री दोन्ही डाळी स्वच्छ धुवून भिजत ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातले पाणी काढून त्या मिक्सर मधून दरदरीत वाटून घ्यायच्या. वाटतानाच त्यात मिरची आले मीठ साखर आणि तेल घालून मिक्स करायचे. मग हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात थोडी हळद घालून चांगले हलवायचे.. साधारण 4 ते 5 मिनिटे.मग त्यात एक चमचा खायच

मसूर बिर्याणी

Image
#मसूर #बिर्याणी 2 वाट्या बासमती तांदूळ 1 वाटी मोड आलेले मसूर 1 कांदा 1 टोमॅटो आले लसूण पेस्ट बिर्याणी मसाला 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतले कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला कूकर मध्ये तेल घालून त्यात कढीपत्ता, कांदा घातला. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घातली.. मग टोमॅटो घातला. थोडे परतल्यावर त्यात बिर्याणी मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, किंचित गरम मसाला घालून परतले. मग त्यात मसूर घालून थोडे परतले.मग तांदूळ घातला. थोडे परतून घेतले.  मग तांदुळाच्या दुप्पट पाणी घातले आणि 1 शिट्टी काढली.  वाफ पडल्यावर कूकर उघडला. गरम गरम बिर्याणी, दही बुंदी आणि पापड सर्व्ह केले.. मसूर उसळी ऐवजी हा प्रकार बरा वाटतो.. पटकन होतो आणि झटकन संपतो... 😀😀😋😋 🙏🙏

ऋषीची भाजी किंवा बडम

Image
#ऋषीची भाजी #बडम गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ही भाजी केली जाते. मला पूर्वी ही भाजी नाही आवडायची.. कारण माहित नाही.. आणि कधी आवडायला लागली ते पण आठवत नाही. दर वर्षी शेजारच्या वहिनी द्यायच्या आठवणीने.. पण या वर्षी त्या अलिबागला असल्याने मला भाजी मिळेल असे वाटले नव्हते... पण मग मी विचार केला की आपण करून बघुया की.. नशिबाने जवळपास सगळ्या भाज्या मिळाल्या.. भेंडी मला आवडत नसल्याने मी घातली नाही 😉 ..  लाल भोपळा, सुरण, बटाटा, रताळे - एक एक वाटी फोडी अळू, लाल माठ, आंबडी - बारीक चिरून एक एक वाटी अळूची देठ, लाल माठ देठ - एक एक वाटी एक किंवा दोन कणसे तुकडे करून (आवडीनुसार) ओले खोबरे 1 वाटी हिरव्या मिरच्या 2  थोडी कोथिंबीर मीठ आधी खोबरे मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. मग एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून तापत ठेवावे. तेल तापले की आधी सगळ्या पालेभाज्या आणि मग सगळ्या फळभाज्या.. मग खोबऱ्याचे मिश्रण आणि शेवटी कणसाचे तुकडे घालून छान परतून घ्यायचे.. चवीनुसार मीठ घालायचे.. थोडे पाणी घालायचे आणि 10 ते 15 मिनिटे मंद ग

भरले पडवळ

Image
#पडवळ #भरलेपडवळ पावसाळ्यात पडवळ छान कोवळे आणि अगदी सहज मिळतात भाजीवाली कडे.. मला तर एकदम बारीक आणि कोवळे पडवळ मिळाले. म्हणून भरली पडवळ करायचे पक्के केले..  माझ्या नेहेमीच्या सवयी प्रमाणे नेहेमी पेक्षा वेगळे काहीतरी करावे.. पण काय करावे असा विचार डोक्यात चालू होता..  नेहेमी एक तर ओले खोबरे नाहीतर दाण्याचे कुट याचेच सारण केले जाते अश्या भाज्यांना.  मला आज जरा वेगळे काहीतरी करायचे होते..  मग काय..सुरू केली कृती.. कांदा बारीक चिरून घेतला. फोडणीत लाल तिखट आणि गरम मसाला घालून चांगला परतून घेतला.मग त्यात दाण्याचे कूट, ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, गूळ, मीठ, धने जिरे पावडर आणि थोडे कश्मिरी तिखट घालून परत छान परतून घेतले. आणि हे मिश्रण गार करायला ठेवले.. तो पर्यंत पडवळाचे गोल गोल छोटे तुकडे केले.. त्यात बिया तश्या नव्हत्याच.. पण तरी चमच्याने आतून रिकामे करून घेतले.  मग त्यात वर केलेले सारण थोडे थोडे भरून घेतले.  एक पसरट पॅन घेतला.. त्यात थोडे तेल घातले आणि हे सगळे पडवळाचे तुकडे नीट लावून त्यावर झाकण ठेऊन मंद गॅसवर दणदणीत वाफ काढली. मग सगळे तुकडे परतून दुसऱ्या साईड ने सुध्धा छान वाफ दिली.. 

बिना ब्रेड चे सँडविच

Image
#suji #sandwitch #bina bread बिन ब्रेड सँडविच 🤔🤔🤔🤔🤔 नॉर्मली आपण सँडविच म्हंटले की डोळ्यासमोर काय येते तर 2 ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्यात वेगवगळ्या प्रकारचे stuffings घालायचं आणि सॉस बरोबर खायचे... पण आज मी एक वेगळेच सँडविच बनवले त्यात ब्रेड नव्हता पण काही भाज्या मात्र होत्या...  एकदम पौष्टीक आणि पोटभर असा नाश्ता किंवा संध्याकाळी चहा बरोबर खायला एकदम छान आहे हे..  तर मग बघुया कसे करतात हे सँडविच... एका बाउल मध्ये एक वाटी रवा घ्यायचा .. जो उपमा करायला वापरतो तोच.. भाजलेला, न भाजलेला कसाही..  त्यात एक वाटी दही घालून नीट एकत्र करून ठेवायचे... 15 मिनिटे भिजू द्यायचे.  तो पर्यंत त्यात घालायच्या भाज्या कापून घेऊया..  थोडे गाजर, भोपळी मिरची, कांदा, टोमॅटो, मटार किंवा कॉर्न, आले मिरची कोथिंबीर  आता हे सगळे त्या भिजलेल्या रव्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्यात अगदी थोडे म्हणजे पाव कप पेक्षा पण कमी पाणी घालायचे. चवी पुरते मीठ, थोडी हळद, लाल तिखट हे पण घालायचे. आता ह्या मिश्रणाचे 3 भाग करायचे.. एक भाग घेऊन त्यात अर्धा टी स्पून इनो घालायचे आहे.. एकदम सगळ्या  मिश्रणात इनो नाही घालायचा. ईनो